“Have you ever thought of trying this colour? I think it would look good on you” “Why would you think that thing would look good on you? It sucks.” Or “What do you do, do you plan to explore further?” “What do you do, don't you think there are plenty of other things that could have been accomplished this whole time?” It's quite easy to recognise that there's a huge difference in both of these sentences in each example, right? Well. The mind that can differentiate and understand the tone, and the meaning of the sentence just by reading, often fails to understand while hearing the same thing from someone.(fails in the sense - of always being unable to understand the true intention of a particular person.) yes, I have the same kind of mind and I believe many of us do. Yeah, I mean sometimes, I just cannot discern the intention of the person, which causes me to doubt myself (self-doubt) and constantly overthink. It creates a very large kind of chaos in my mind, which I know is...
परीक्षा संपल्यानंतरच्या सुट्ट्यांचं प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं महत्व असायचं. काहीजण आपापल्या गावी जायचे, तर काहींच्या घरी कोणीतर आलेलं असायचं. तर काहीजण कॅम्प/कोर्स जॉईन करायचे. माझ्यासाठी अशा सुट्ट्या म्हणजे पक्ष्यांना खायला, प्यायला द्यायचं, एखादं कुत्रं,मांजर दिसलं की त्याला बोलवून लाड करायचे, खायला द्यायचे दिवस असायचे. मे महिन्याच्या सुट्टीत सुरू केलेल्या उपक्रमांना परत सातत्य मिळायचं ते दिवाळीच्या सुट्टीत. सकाळी लवकर उठून टेरेस वर जाऊन तांदूळ, पाणी ठेवायचं आणि दिवसभर त्यांचा किलबिलाट ऐकत बसायचं! मी लहान असताना आमच्या आजूबाजूला फारशी घरं नव्हती. त्यामुळे दादा शिवाय जास्त कोण खेळायला नसायचं.खेळायला मैत्रिणी वगैरे नसल्यामुळे मला प्राण्यापक्ष्यांचा जिव्हाळा जास्त असावा, असं मला वाटतं. शिवाय घरातही सगळ्यांना झाडे, प्राण्यांबद्दल वेगळीच आत्मीयता असायची.
मी तिसरीत असताना आम्ही एक कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं(टॉमी त्याचं नाव) पण ते कधीही बांधलेलं नसायचं. जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जायला निघायचो तेव्हा आम्ही निघायच्या आधी तो गेट जवळ हजर असायचा, आणि आम्ही परत येईपर्यंत घराची राखण करायचा. आम्ही घरी आलो की परत निघून जायचा आणि अधेमधे काही लागलं तर तो मलमपट्टी करायला दवाखान्यात यावं तसा यायचा! मुळात आमचा टॉमी म्हणजे पाहुणा असल्यासारखा घरातला सदस्य होता.
असंच एकदा दिवाळीची सुट्टी लागली होती. तेव्हा आमच्या पलीकडील घराचं बांधकाम सुरू होतं,त्यामुळे वाळूचा ढीग होता आणि नेहमीप्रमाणे कुत्रे येऊन खेळत असत. असच एकदा एक कुत्री (मादी) आली होती. तिला नुकतीच पिल्लं झाली होती. तिचा रंग पाठीवरती हलका काळा, आणि बाकीच्या बाजूला पिवळसर असा होता. साहजिकच ती इतर कुत्र्यांच्या पेक्षा वेगळी आणि उठावदार दिसायची. ती आमच्या घराजवळ आली तेव्हा तिला पाच गोंडस पिल्लं होती.शेजारच्या मुलांनी तिचं नाव राणी ठेवलं होतं. ती कोणा माणसाजवळ अजिबात जात नसायची; पण पिल्ली असल्यामुळे भुकेमुळे ती यायची. तिच्यासोबत पिल्लू आहे,ती चावू शकते असं सगळे म्हणायचे म्हणून मला तिला खायला घालताना थोडीशी भीती वाटायची म्हणून मी आईला सोबत घेऊन जायचे. पण ती अतिशय मायाळू होती. ती पिलांना लाड करू द्यायची पण तिला हात लावू द्यायची नाही.खायला दिल्यानंतर ती आधी आपल्या पिलांना खाऊ द्यायची आणि मग स्वतः खायची (आईच ती शेवटी!). नंतर एक एक करून तिची पिल्ले पाळायला म्हणून लोकं घेऊन गेले. आता फक्त राणी आणि एक पिल्लू राहिलं होतं.
एकदा सकाळी नऊ च्या दरम्यान राणी घरासमोर येऊन जोरजोरात ओरडू लागली. मला वाटले तिला कोणी दगड मारला की काय म्हणून तिला नीट बघितले. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की तिच्यासोबत तिचं पिल्लू नाहिये. मी बाहेर येताच ती वाळूच्या ढिगाऱ्याच्या दिशेने पळू लागली. मी तिच्या मागे गेल्यावर मला कळले की ती का भुंकत होती! तिच्या पिलाचं तोंड एका प्लास्टिक च्या भांड्यात अडकलं होतं! पिल्लाचा जीव ओरडून ओरडून दमला होता. त्यात भांडं घट्ट बसल्याने श्वासही घ्यायला त्रास होत होता. मी भांडं काढायचा प्रयत्न करू लागले, पण राणी घाबरून मध्ये मध्ये येऊ लागली. माझ्या एकटीकडून हे होणं अशक्य होतं, म्हणून मी लगेच मम्मीला बोलावलं. नाइलाजाने मला राणी ला जवळ घेऊन तिला शांत केलं व तीही शांत झाली. तोवर मम्मीने पिल्लाची त्या भांड्यातून अखेर सुटका केली! राणीचा ही जीव भांड्यात पडला आणि पिल्लाला चाटू लागली. ते दृश्य खरच पाहण्यासारखे होते! तेव्हा पहिल्यांदा मी तिला हात लावला आणि तिनेही लाड करून घेतला. त्यानंतर दररोज ती तिच्या पिल्लाला घेऊन यायची. खूप बरं वाटायचं त्यांना बघून. ती जर भेटायला आली नाही, तर काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. शाळा सुरू झाल्यानंतरही हा दिनक्रम असाच सुरू होता.
एके दिवशी राणी संध्याकाळची घरी आली. तिला नेहमीप्रमाणे मी खायला दिले, तरी ती खायला तयार नव्हती. कदाचित बाहेरून काहीतरी खाऊन आली असावी असं वाटलं म्हणुन मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. अंधार पडू लागला. ती तरीही जायला तयार नव्हती. ती आपल्याकडेच थांबणार, म्हणून मला आनंद झाला होता खरा; पण तिचं पिल्ला कडे जाणं ही गरजेचं होतं. ती अजिबात उठायला तयार नव्हती. ती आमच्या घराच्या व्हरांड्यात दाराकडेच तोंड करून झोपून होती. आई दादांनी मला तिच्याकडे जाऊ नकोस असे सांगितले होते. मला यामागचं कारण तेव्हा कळलं नव्हतं. मी अभ्यासाला बसले. अभ्यास करून झाल्यानंतर ती पिल्लाकडे गेली, कि नाही हे बघायला गेले तेव्हा ती तिथेच होती. तिचे डोळे पूर्ण मिटले नव्हते, तिचा श्वास थांबला होता, तिने आपले प्राण सोडले होते. माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी आले. माझ्या घरच्यांनी मला जवळ घेतले.बाकीच्या लोकांचे ''जनावराचं असं दारासमोर येऊन मरणं चांगलं नसतं(अशुभ असतं)'', "म्हणून जनावरांचे नसते लाड करायचे नाहीत",असे काहीसे शब्द माझ्या कानावर पडत होते, त्यामुळे मला तसं बोलणार्यांचा राग येऊन आणखी रडू येत होतं. तेव्हा मला दादांनी (माझ्या आजोबांनी) समजावलं होतं. राणीला तिचा शेवटचा काळ सुरू झाल्याची चाहूल लागली होती. तिने तिचा अखेरचा श्वास आपल्या दारासमोर येऊन सोडणं, हा फक्त एका निष्पाप जिवाचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता...राणी ने खरंच अखेरपर्यंत माझी आठवण ठेवली! तेव्हापासून माझ्या मध्ये प्राण्यांबद्दलची आत्मीयता आणि प्रेम आणखी वाढलं!